उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद नगरपरिषेद क्षेत्रात बांधकाम करीत असताना अडचण निर्माण होणारी झाडे तोडावी लागत आहेत. त्याच प्रमाणे येथील सरस्वती हायस्कूल परिसरातील नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने 20 वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई गजेंद्रगडकर यांच्या कार्यकाळात  लावण्यात आलेले अतिशय सुंदर असे गुलमोहरचे झाड काढण्यात आले होते. बांधकामुळे इजा होऊन उन्मळून पडलेल्या 20 वर्षांपूर्वीच्या गुलमोहरच्या  झाडाला जीवदान देण्यासाठी रोटरी क्लबचे सदस्य अभिजित पवार यांच्या कल्पनेतून शहरातील रोटरी क्लबचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  रोटरी क्लबने पुढाकार घेतला. 

नवीन इमारतीचे बांधकाम करीत असताना उन्मळून पडलेल्या गुलमोहरच्या झाडाच्या खोडाला सुदैवाने कुठलीही इजा झाली नव्हती. झाड उन्मळून पडले होते. परंतु त्या झाडाच्या खोडाला नवीन पालवी फुटली होती. वृक्षाच्या खोडाला पालवी फुटल्याचे पाहून अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लबचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह  रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन

झाडाच्या मुख्य खोडाला जेसीबीच्या सहाय्याने येथील एम.आय.डि.सी.परिसरातील राधानगरीमधील ए.पी.प्रायमरी स्कुलच्या प्रांगणात जेसीबीच्या सहाय्याने सहा बाय सहाचा खड्डा खोदून रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हे झाड लावण्यात आले. 

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव इंद्रजित आखाडे, माजी प्राचार्या रो. डॉ.अनार साळुंखे मॅडम, अभिजित पवार, सौ.पल्लवी पवार, रो.साळुंखे दादा,सुरज कदम, रो.सुनिल गर्जे,सुरसेन घोगरे, शेखर घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

एकीकडे कत्तल दुसरीकडे झाडाला जिवदान दिल्याचा आनंद पर्यावरणाला प्रदुषण मुक्त करण्यासाठी झाडाचे महत्वाचे योगदान आहे. यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करुन वृक्षारोपण कार्यक्रम राबवित आहे. तर दुसरीकडे अनेक झाडांची कत्तल केली जाते. तर तिसरीकडे पर्यावरण प्रेमी येथील रोटरी क्लबने पुढाकार घेऊन गुलमोहरच्या तीन झाडांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा मनस्वी आनंद होत आहे.

                                                        अमरसिंह देशमुख रोटरी क्लब अध्यक्ष उस्मानाबाद

 
Top