तुळजापूर /प्रतिनिधी- 

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरचा इतिहासात प्रथमच महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचा शारदीयनवराञोत्सव फक्त  धार्मिक विधी होवुन अंत्यत साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहीती श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान ने प्रसिद्धी पञक काढुन दिली आहे.

श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थानने शारदीयनवराञोत्सव साजरा करण्या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटलं आहे की , धार्मिक ठिकाणे व प्रार्थना स्थळे बाबतीत 1 आँक्टोबर ते 31 आँक्टोबर 2020 या कालावधी करीता मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सुचनांचे पालन करीत साजरा केला जाणार आहे,

या कालावधीत  वाहनांनी व पायी येणाऱ्या भक्तांना तिर्थक्षेञ तुळजापूरात प्रवैश दिला जाणार नाही तिर्थक्षेञ तुळजापूर येयुन सार्वजनिक नवराञोत्सव मंडळांना भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी शहरात प्रवेश दिला जाणार नाही शारदीयनवराञोत्सवात पुर्वापार परंपरे प्रमाणे धार्मिक विधी साठी आवश्यक असणारे मंहत पुजारी सेवैदार मानकृरी यांनाच मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे.सदर परवानगी उपविभागीयपोलीसअधिकारी व तहसिलदार यांचा मान्यतेने देण्यात येणार आहे.रँपिडअँन्टेजन तपासणी शिवाय मंदीरात प्रवैश दिला जाणार नाही

घरी राहा सुरक्षित राहा या संकल्पनेतुन शारदीयनवराञोत्सवात भाविक भक्तांनी श्रीतुळजाभवानीचे दर्शन www,shrituljabhavani.org या मंदीर संस्थानच्या अधिकृत  संकेत स्थळावरुन घेवुन मंदीर संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन मंदीर प्रशासना ने केले आहे.


 
Top