उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणास दिलेली स्थगीती लवकरात लवकर उठवून मराठा समाजाला आरक्षण पूर्ववत करावे, कोपर्डी येथील ताईला न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ फाशी द्या, मराठा समाजाच्या आरक्षणास मा.सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती येण्यापूर्वी लाभ मिळालेल्या विद्यार्थी व नौकरदार यांचा मराठा आरक्षणाचा लाभ कायम ठेवावा यासह विविध मांगण्याठी मराठीा समाजाच्या वतीने खासदार व आमदारांच्या घरासमोर शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी ढोल वाजून आंदोलन केले. त्यानंतर आपल्या विविध मांगण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ सालच्या ई.एस.बी.सी.प्रवर्गाकरीता (मराठा आरक्षण) राखीव जागेवर २०१८ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रं.६२ मधील कलम १८ अन्वये उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळावी, केंद्र सरकारने मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी भारतीय संविधानात योग्य ती दुरुस्ती व तरतुद करावी, एस.सी.एस.टी.ॲक्ट या अॅट्रोसिटी कायद्यात मा.सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन बाबतचा दिलेले निकाल व निर्देश डावलून, सदर कायद्यात ज्याप्रमाणे केंद्र सरकारने अटकपूर्व जामीन देवू नये अशी तरतुद केली, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायद्यात व संविधानात योग्य ती दुरुस्ती करावी,संविधानाचे केंद्र सरकारने संविधानातील कलम ३७० काढून टाकले त्याचप्रमाणे आरक्षणाची ५०% कोटयाची मर्यादा केंद्र सरकारने काढून टाकावी जेणेकरून मराठा आरक्षण वैध ठरेल,सारथी संस्थेच्या अध्यक्ष पदी मा.खा.श्री.छञपती संभाजीराजे भोसले महाराज यांची नियुक्ती करावी. आदी सह विविध मांगण्यात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात सकल मराठा समाजाने भाग घेतला होता.