उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्यातील दिनांक १२ आक्टोबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद, मूग, तूर, उस व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांनकडे निवेदनाद्वारे करण्यात आली


आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  शेतकरयांचे पशुधन,राहते घरे व शेतातील जनावरांचे गोठे यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व शेतामधील माती देखील धुऊन गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला पुढील पेरणी करणे देखील अवघड आहे. यामुळे अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत.त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न अवड झाला आहे आता फक्त आपल्या सहकार्याची आवशकता आहे. यासर्व गोष्टी आपणास व प्रशासनास माहिती असल्यामुळे आपण आपले दौर रद्द करावे त्यात वेळ न घालवता शेतकऱ्याला ताबडतोब मदत कसी देता येईल हे पाहणे गरजेचे आहे मागील आपत्ती झाली तेव्हा मंत्र्यांचे दौरे व पालक मंत्र्यांचे दौरे व शासकीय दौ - यातून काहीहि निष्पन्न झाले नाही. म्हणून कुठल्याही प्रकारची अट न घालता शेतक-यास भरगोस मदत जाहीर करावी ,पीक विमा १०० % जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यामुळे त्याची स्वतंत्र मदत जाहीर करावी.तसेच पीक विमा नुकसान ऑनलाईन दाखल करण्याची अट रद्द करण्याची मागणी केली आहे.

 
Top