उस्मानाबाद / प्रतिनिधी 

उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले 3 माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २020 मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या (NEET) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर आण्णा पाटील यांच्या संकल्पनेतून श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांच्या NEET परीक्षेच्या तयारीसाठी खास फोटॉन बॅच सुरू आहे या बॅचला शिकविण्यासाठी दिल्ली. कोटा येथील तज्ञ प्राध्यापक वृंद आहे मागील दोन वर्षापासून केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे या फोटॉन बॅचमधील दोन विद्यार्थी शासकीय वैद्यकीय (M.B.B.S.) प्रवेशासाठी पात्र ठरलेले आहेत. यामध्ये उंबरे अमर युवराज (७२० पैकी ५७० गुण), गाढवे श्रेयश रामा (७२० पैकी ५६७ गुण), हे विद्यालयातून अनुकमे प्रथम व द्वितीय आलेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी बीडीएस, बी. ए एम.एस. व इतर शाखेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहे.पात्र ठरलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकासह मा.श्री.सुधीर आण्णा पाटील यांच्या हस्ते सन्मान-चिन्ह, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुधीर आण्णा पाटील म्हणाले की, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून उस्मानाबाद पॅटन तयार करण्याच्या उद्देशाने हे पहिले यशस्वी पाउल आहे त्याचे विशेष कारण असे की, वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी कोणतेही खाजगी क्लास लावलेला नव्हता.विद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परीश्रमाचे हे फळ आहे येत्या काळात उस्मानाबाद पॅटन च्या यशाचा हा आलेख वाढत राहील.यावेळी प्राचार्य, प्रा.साहेबराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.नंदकुमार नकटे, फोटॉन प्रमुख प्रा.अरविंद भगत तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य देशमुख यांनी, सुत्रसंचालन प्रा.सुर्यकांत कापसे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा.भगत यांनी मानले.

 
Top