- बीड येथील आदित्य कृषिमहाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी दूत वाघमारे अभिषेक व प्रताप मुंढे याने प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना उक्कडगाव येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने बिजोपचार कसे करावी याबाबत माहिती दिली.या मध्ये बीजोपचार कसा करावा त्यामध्ये कोणते जैविक खत व बुरशीनाशक असावे, त्यावर करायचे उपचार आणि खत व्यवस्थापन व यासाठी लागणाऱ्या व सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने बिजोपचार कसा करता येतो याचे प्रात्याक्षिक करून शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
काढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात.वातावरणामध्ये भरपूर बदल होतात त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते. तसेच शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात.याचे ही प्रात्यक्षिक कृषी दुतानी केले. याउपक्रमामध्ये आदित्य कृषी महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ. मुंडे सर कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.धुळगंड सर व विषयतज्ञ प्रा.डॉ. बी. एन मुंडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
