उस्मानाबाद / प्रतिनिधी-
येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा धर्मानुरागी तेजराज कन्हैय्यालाल मुथा (78) यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मधील सेवानिवृत्त अधिकारी पोपट मुथा व सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी राजमल मुथा यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. येथील व्यापारी विजय मुथा यांचे ते वडिल होत. उठावणा कार्यक्रम शनिवारी सकाळी 11 वाजता मारवाडी गल्ली येथील जैन स्थानक येथे होणार आहे.