तुळजापूर / प्रतिनिधी -

 कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीरात  शारदीय नवराञोत्सव कालावधीत भाविकांसाठी  प्रवेश बंद असणार आहे. या पार्श्वभूमीवर   देवी दर्शन आताच  करण्यासाठी व माळपरडी बदलण्यासाठी धार्मिक वृत्तीचे भाविक नवरात्रोत्सव सुरू होण्यापुर्वीच मंदीरा समोर गर्दी करीत आहेत.

मंगळवारी भाविकांनी मोठ्या संख्येने माळपरडी घेवुन जाण्यासाठी तसेच कर्नाटक राज्यातील भाविक घटस्थापना करण्यासाठी श्रीफळ पुजा करुन नेण्यासाठी गर्दी केली होती.  कोरोना पार्श्वभूमीवर शारदीयनवराञोत्सवात येणारा देविभक्त श्रीतुळजाभवानी मातेच्या मंचकीनिद्रा अवस्था कालावधीत येत असल्याने सध्या श्रीतुळजाभवानी मंदीरा समोरील परिसर भाविकांनी गजबजून जात आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांनसाठी प्रवेश बंद असल्याने या सहा महिन्याच्या कालावधीत ज्या भक्तांच्या घरातील व्यक्तीचे  निधन होते ते मंडळी सध्या सुतकातील जुनी परडी ठेवून नवीन परडी घेवुन जाण्यासाठी मंदीरा समोर गर्दी करीत आहे.पुर्वी जुनी परडी होमकुंडाजवळ ठेवली जात होती. परंतु मंदीरात प्रवेश बंदी असल्याने भाविक महाध्दार समोर जुनी परडी ठेवुन नवीन परडी महाद्वाराच्या   प्रथम पायरीला भेट करुन शारदीयनवराञोत्सवसाठी गावी घेऊन जात आहे .त्यामुळे सध्या महाद्वारा समोर जुन्या माळपरड्यांची खच पडत असुन रोज ट्रकटूर भर भरडी येथुन नेली जात आहे.  सध्या आंध्र, कर्नाटक  सह सोलापूर भागातील भाविकांचीच मोठी गर्दी होत आहे.

 
Top