तुळजापूर / प्रतिनिधी - 

अधिक मासातील शेवटच्या मंगळवारी दि.6 रोजी  श्रीतुळजाभवानी मातेच्या  दर्शनासाठी  भाविकांनी गर्दी केल्याने  मंदीरासमोरील परिसर भाविकांनी व वाहनांनी गजबजून गेला होता. 

अधिक मासातील,वारी पुर्ण करण्यासाठी राज्यासह परराज्यातुन भाविक खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने येत असल्याने मंदीर महाद्वारासमोरील परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे. श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवराञोत्सवात भाविकांना शहरात प्रवेश बंदीच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी वाढल्याचे बोलले जाते. मंगळवारी पहाटे पासुनच भाविक वर्ग खाजगी वाहनांनी मोठ्या संख्येने आला होता. मंगळवारी राज्यासह कर्नाटक, आंध्र या राज्यातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. काही भाविक कोरोनाची काळजी घेत तोंडाला मास्क बांधुन दर्शन घेत होत तर काही अजुनही  दक्षता घेत नसल्याचे दिसुन येत होते 

 
Top