उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कृषि विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत दर वर्षी प्रमाणे अनुसुचीत जाती व नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यासाठी डॉ. बाबसाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसुचीत जमाती प्रवर्गातील शेतक-यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत नवीन सिंचन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती किंवा शेततळयास अस्तरीकरण यापैकी कोणत्याही एका पॅकेजचा लाभ देण्यात येणार आहे. दोन्ही योजनांचा कालावधी नवीन विहिर पॅकेजसाठी दोन वर्षांचा असुन इतर पकेजसाठी एक वर्षाचा राहील. तरी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व अनुसूचीत जाती अनुसुचीत जमाती प्रवर्गातील शेतक-यांना योजनांचा घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळ ऑनलाईन अर्जासाठी उपलब्ध झालेले असुन योजना अटी व शर्तीच्या अधीन राहून जास्तीत जास्त शेतक-यांनी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सभापती, कृषि व पशुसंवर्धन, अति मुख्य कार्याकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा स्तरीय निवड समिती व कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केलं आहे.

 या योजनेच्या अटी व शर्ती  पुढील प्रमाणे आहेत…शेतकरी हा अनु. जाती किंवा अनु. जमाती प्रवर्गातील असावा.शेतक-याकडं सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.शेतक-याकडे आधार कार्ड असावे व बँक खाते आधार कार्ड सोबत सलग्न केलेले असावे.शेतक-याचे वार्षिक उत्पन्न दिड लाखाच्या मर्यादेत असावे व 2019.20 या आर्थिक वर्षाचे तहसिलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र असावे.शेतक-याचे नावे किमान 00.40 हेक्टर व कमाल 06.00 हेक्टर जमीन असावी.कुटुंबातीन कोणत्याही सदस्याने शासकीय योजने मधुन या घटकाचे लाभ घेतेलेला नसावा.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन वाटप किंवा परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 वनपट्टे धारक शेतक-यांची या योजनेमधुन प्राधान्याने निवड केली जाते.

  या योजना पॅकेज स्वरुपात राबविण्यात येणार असून नविन सिंचन विहिर पॅकेज किंवा जुनी विहिर दुरुस्ती पॅकेज किंवा शेततळे अस्तरिकरण पॅकेज यापैकी एका पॅकेजसाठी शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन मुळ प्रत कृषि विभाग पंचायत समिती येथे समक्ष सादर करावी व त्याची पोहच घ्यावी. अधिक माहितीसाठी नजीकच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषि विभाग किंवा कृषि विभाग, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा.टिप : या योजना मधील नवीन सिंचन विहिर पॅकेज निवडलेल्या प्रतिक्षाधीन यादीतील लाभार्थीना राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत लक्षांकानुसार फक्त नविन सिंचन विहिर या बाबींचा लाभ देण्यात येईल.असे कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 
Top