कळंब / शिवप्रसाद बियाणी -

कळंब तालुक्यात मागील दिवसात खुप मोठा प्रमाणात पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतातील पिकात पाणीच पाणी झाले असून पदरात पिक पडते का नाही या चिंतेत शेतकरी वर्ग असला तरी त्यात अजुन एक संकट म्हणजे सोयाबीन काडणी मजुराचा भाव वाढल्याने पिकाला उतार जरी असला तरी बाजार पेठेत केलेला खर्चाचा तरी भाव मिळेल का नाही यात पुर्ण शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला दिसुन येत आहे

सध्या एकिकडे पुर्ण राज्यात कोविड 19 ने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली असुन मृत्यू दर देखील वाढला असल्याने देशाचि पुर्ण अर्थिक स्थिती ढासळत चाललेली आहे. त्यात भक्कम अर्थिक कणा म्हणून ओळख असलेल्या शेती व्यवसायावर सुध्दा सध्या खुप मोठ्या प्रमाणावर संकट आलेली आहेत. या हंगामात निसर्गाच्या कृपेने वेळेवर पाऊस पडल्याने शेतकरी अंनदात होता त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काडुन शेतात पेरणी केली होती त्यात खुप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी केली गेलीली आहे गेल्या महिन्यात कळंब तालुक्यातील सोयाबीन पीक पाहीले असता भरमसाठ उत्पन्न पदरात पडेल या आशा शेतकऱ्यांच्या मनात पल्लवीत झाल्या होत्या परंतु ऐन पिक काडनी च्या वेळी मागील काही दिवसात परतीच्या पावसामुळे आशेची निराशा झाली आणि शेतातील पिकात पाणीच पाणी झाले असल्याने आता आपलं कस होईल ही धास्ती शेतकर्‍यांना सतावत होती. काही ठिकाणी सोयाबीन पिक जरी चांगले आले असले तरी त्यात पिक काडणार्या मजुरांनी काडणी चा भाव वाढवला आहे एक सोयाबीन बॅग काडण्यासाठी जवळपास 4500 ते 5000 हजार रुपये मोजावे लागत आहे

गेल्या वर्षी 1800 ते 2000 हजार भाव होता परंतु या वर्षी तिपटीने काडणी भाव वाढल्याने सोयाबीन पिकाला उतार जरी मिळाला तरी एक रुपया तील पच्चाहंत्तर रक्कम शेतकऱ्यांनी शेतात खर्च केली असल्याने पुन्हा एकदा कर्जाचा डोंगर शेतकर्‍यांवर आलेला दिसुन येत आहे. 

पेरणीपासून मळणीपर्यंत शेतकर्‍यांचा राबता फुकट झाला शेवटी सर्व खर्च वजा जाता हातात फक्त भुस्कट राहिले. पेरणीसाठी, बि खतासाठी घेतलेले  बँकाचे पैसे बाकीच राहिले. पुढची पेरणी कशी करणार हा मोठा प्रश्न शेतकर्या पुढे निर्माण झाला असला तरीही हिमतीने सर्व संकटाना तोंड देत आहे. कारण तो जगाचा पोशिंदा आहे. आशा पोशिंद्याला शासनाच्या मदतीची नसली तरी पिकाला आधारभूत किमतीची अत्यंत गरज आहे. 

शासनाने जाहिर केलेल्या आधारभूत किंमतीला सोयाबीन पिक घेणार्‍या कंपण्या कोणत्याना कोणत्या कारणाने काही दिवस चालू तर बरेच दिवस बंद ठेवल्या जात आहे. आणि या बंद झाल्याच्या दिवसामध्ये दलाल चतुर कंपनी बंद असल्याचे कारण सांगून शेतकर्‍यांचा माल पाडून मागतात. नाविलाजाने गरजेपोटी  शेतकर्‍यांला आपला माल दलाल सांगेल त्या किमतीला द्यावा लागतो. शासनाने जाहिर केलेली आधारभूत किंमत देणार्‍या कंपनी फेडरेशन इ. विनादिक्कत, व विनाअडथळा चालवाव्यात. जेणेकरून कंपनी बंदच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी लूट व पिळवणूक थांबेल. एवढी मापक अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

 
Top