लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तहसील कार्यालयातील महसलु कर्मचाऱ्यांनी दिनांक 28 ऑक्टोबर 2020 पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन यांना नायब तहसीलदार पदोन्नती, नायब तहसीलदार यांना तहसीलदार पदोन्नती देण्यात यावी व तसेच फौजदारी प्रकरणात अरोप-संक्षमित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त चौकशी-निर्णयाच्या अधिन राहुन पदोन्नती देण्यात याववी, या मागणीसाठी दि. 28 ते 29 ऑक्टोंबर 2020 रोजी पर्यंत सामूहिक रजेवर जात आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्हा महसुल संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भागवत गायकवाड, बी.डी चामे, एस.ए. येरटे, पी.आर.वडणे, जि.जे.देवगीरे, आर.जी. खुटेपड, डी.एन. सुर्यवशी, पी.डी.माटे, एम.जी.जाधव, वजीर अत्तार, एस.ए.गवळी, ए.बी.अशोक क्षिरसागर, ए.एल. राठोड, बी.बी.गडदे, यांच्या सह्या आहेत.