जिल्हाधिकारी कार्यालयातील महसलु कर्मचाऱ्यांनी दि. 2८ ऑक्टोबरपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करून विविध मागण्यांचे निवेदन उस्मानाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघठनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन यांना नायब तहसीलदार पदोन्नती, नायब तहसीलदार यांना तहसीलदार पदोन्नती देण्यात यावी व तसेच फौजदारी प्रकरणात अरोप-संक्षमित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त चौकशी-निर्णयाच्या अधिन राहुन पदोन्नती देण्यात यावी, या मागणीसाठी दि. 2८ ते 29 ऑक्टोंबर 2020 रोजी पर्यंत सामूहिक रजेवर जात आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष माधव मैंदपवाड,उपाध्यक्ष शितल माजलगांवकर,सचिव प्रमोद चंदनशिवे, कार्याध्यक्ष सुभंग काळे, महसूल सहाय्यक अमरदिप शिंदे, पोपट मोराळे, यु.डी.माने, एस.बी.गाढवे, शालीर शेख, एस.एस.पतंगे, पी.के.कदम, के.एस.गायकवाड, के.एस.कुलकर्णी, ए.एन.आडसुळे, एस.डी. पांचाळ, एन.एम.मुंढे, आतिष बनसोडे, के.डी.काशीद, एस.आर.वाघमारे, डी.पी.ढवण, सी.एफ गजभार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.