आपल्या पेन्शनच्या पैशातून कपडा खरेदी करून स्वतः शिलाई मशीन वर रोज तीन तास शिलाई काम करून मास्क शिवून जनतेमध्ये मास्क चे मोफत वाटप करणारे स्टेट बँक ऑफ हैदराबाद चे सेवानिवृत्त अधिकारी श्री कमलाकरराव नागटिळक यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कळंब तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कळंब रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉक्टर गिरीश कुलकर्णी हे होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज आडसुळ होते. तर उपस्थितांमध्ये कार्याध्यक्ष डॉक्टर माणिकराव डिकले, उपाध्यक्ष ॲडव्होकेट त्रिंबकराव मनगिरे, प्रकाशराव भडंगे प्राध्यापक संजय कांबळे, उपाध्यक्ष अच्युतराव माने, मोहम्मद चाऊस, बाबुशेठ लोढा, संभाजीराव चौधरी, बब्रुवानजी पांचाळ, सुरेश टेकाळे हे उपस्थित होते डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून नागटिळक यांच्या कार्याचे कौतुक केले नागटिळक साहेबांचे या वयातील हे कार्य आमच्या पुढील आदर्श तर आहेतच पण त्यांची प्रेरणा आम्ही तरुणांनी घेणे आवश्यक आहे रोटरी क्लबऑफ कळंब सिटी तर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
आपल्या उत्तरात नागटिळक साहेबांनी सर्वांचे आभार मानून ज्येष्ठ नागरिकांनी कुठलीही आशा न करता निस्वार्थ भावनेने कार्य करून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे असे मत मांडले.
श्री डी. के. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बब्रुवान पांचाळ यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी. आर. पाटील यांनीही ही फोन वरून नागटिळक यांना शुभेच्छा दिल्या शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली