तेर / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रूग्णालयास अखेर कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक मिळाले असून डॉ. नागनंदा मगरे यांंनी पदभार स्विकारला आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद पाच वर्षांपासून रिक्त होते. डॉ. नागनंदा मगरे हे नाशिक जिल्ह्यातून येथे बदली होवून आले आहेत. त्यांनी गुरुवारी (दि.१) पदभार स्विकारला. यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य इर्शाद मुलानी, पत्रकार सुमेध वाघमारे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कोठावळे, डॉ. विजय विश्वकर्मा, डॉ. स्नेहल क्षीरसागर, अधिपरिचारिका सविता चाकाटे, कार्यालयीन अधीक्षक अमोल आग्रे व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.