उस्मानाबाद/ प्रतिनिधी 

 येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच पक्ष संघटनेचा आढावा घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांनी बैठकीचे नियोजन केले होते. कोणत्याही परिस्थितीत पक्ष संघटनेत कार्यरत व कष्ट करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळात पक्ष संघटनेत प्राधान्य देणार असल्याचे शेख यांनी सांगितले. आगामी काळात निवडणुकीच्या अनुषंगाने संघटना बांधणी, बुथ कमिटीचे नियोजन, जनतेशी संवाद तसेच पक्षाचे चालू असणारे काम व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या बैठकीला जिल्ह्यातील ८ तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आदित्य गोरे यांनी पदाधिकारी नेमणूक व त्यासाठीच्या निकषांची माहिती दिली. आदित्य गोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेले पक्ष संघटना व पक्ष बांधणीचे काम, गाव भेट अभियान, कार्यकर्ता अभियानाचा लेखाजोखा मांडला. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांना काम करण्याचे आवाहन केले. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन बागल यांनी मार्गदर्शन केले. महेश चोपदार यांनी प्रस्तावना व आभार मानले. बैठकीस जिल्हा प्रभारी प्रशांत बाबर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवडे, तारीख मिर्झा, प्रदेश सचिव काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, कळंब तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, जिल्हा युवक सचिव विश्वजीत चुंगे, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, अमोल सुरवसे, लतीफ पटेल, शंतनू खंदरे, रोबिन बागडे, ज्ञानेश्वर निंबाळकर, पृथ्वीराज आंधळे, नाना पाटील, जावेद मुजावर, दादा पाटील, भागवत भंडारकर, राज भाई चौस, सौरभ देशमुख, सुदर्शन करंजकर, औदुंबर धोंगडे, उमेश मडके, सचिन मडके, समाधान बनाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top