तुळजापूर/ प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी मध्ये तुळजापूर येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी यांची भारतीय जनता पार्टी, ‘महिला मोर्चाच्या’ प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना नियुक्त पत्र महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ उमा गिरीश खापरे यांनी दि. 3 रोजी दिले . मीनाताई सोमाजी यांची नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापूर तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच अष्टभुजा महिला नागरी पतसंस्था यांच्या वतीने ही निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.