उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे झालेल्या पावसाने बाळु रानबा पौळ यांच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.यात घराला चीरा पडल्याने व घरावरील पत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे.याप्रसंगी आळणी गावातील माजी सरपंच धनंजय वीर,रवि कोरे आळणीकर ग्राम रोजगार सेवक दादा गायकवाड यांनी घटनास्थाळाची पाहणी करून तात्काळ झाड बाजुला करून मदत केली.