तुळजापूर / प्रतिनिधी -
तुळजापुर येथील घाटशिळ घाटातील वळण रस्त्यावर घाटात अतिवृष्टि मुळे झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. माञ प्रशासनाची वाट न पाहता आनंद दादा कंदले मित्र मंडळाने तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजुला करुन रस्ता मोकळा करुन,वाहतुक सुरळीत केली .यावेळी जेसीबी मालक दशरथ पवार यांनी विनामुल्य सहकार्य केले तसेच दिनेश बागल, सुलेमान शेख, आण्णा देवकर, लक्ष्मण देवकर, आजय धनके, सोमनाथ देवकर, तानाजी धनके, कुणाल रोंगे व मित्र परिवाराने सहकार्य केले.