महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञोत्सवात राजेशहाजी महाद्वारावर तुळजाभवानी माता, छञपती शिवाजी महाराज यांची चलचिञे , कोरोना बाबतीत जनजागृती करणारे संदेश व कोरोना योध्दांना सलाम करणारी नेञदिपक अशी ऐलईडीपिक्सल विद्युत रोषणाईतुन कोरोना योध्दांना सलाम करण्यात आला आहे.
या नेञदिपक विद्युत रोषणाईचे उद्घाटन मंगळवार राञी साधेपणाने करण्यात येवुन पाहण्यासाठी खुली करण्यात आली. त्याचबरोबर पोलिस आरोग्य खात्यातील कर्मचारी जे कोरोना रोखण्यासाठी अहोराञ परिश्रम घेतात त्यांना सलाम करणारे संदेश छायाचिञांन सह राजमाता माँ जिजाऊ महाध्दारवर एलईडीपिक्सल स्वरुपात विद्युत रोषणाईतून जनजागृती करण्यात येत आहे. श्रीतुळजाभवानीमातेच्या शारदीयनवराञोत्सवात राजेशहाजी महाद्वारावर कोरोना योध्दोना सलाम करणारा संदेश लाखो कोरोना योध्दांना साठी उत्साह वाढविणारा आहे.
यात माझेकुंटुब माझी जबाबदारी , मास्क वापरा कोरोना टाळा सोशल डिस्टंन्स पाळा यासह कोरोना बाबतीत जनजागृती करणारे संदेश चलचिञ रुपात आहेत. त्याच बरोबर महिषासुर मर्दीनी अलंकार महापुजा , छञपती शिवाजी महाराज श्रीराम सह घोड्यावरुन द-याखो-यात दौडत असणारे छञपती शिवाजी महाराज, भारताचा तिरंगी ध्वज श्रीतुळजाभवानी संबंधित चलचिञ या विद्युत रोषणाईत आहेत तसेच आकर्षक विद्युत रोषणाई येथे पहावयास,मिळणार आहे.
राजेशहाजीमहाध्दार बनणार सेल्फी पाँईट
राजेशहाजीमहाध्दार वरील आकर्षक विद्युत रोषणाई बघितली कि सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरणार नसल्यामुळे युवावर्गासह भाविकांनसाठी हा सेल्फी पाँईट राहणार आहे. ही विद्युत रोषणाई टोळगे, उंडाळे बंधुनी केली असुन वर्षभरातील पोर्णिमा मंगळवार,शुक्रवार रविवार कार्यरत असणार आहे.