उस्मानाबाद/ प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांच्या संदर्भात मंजूर केलेल्या विधेयकाच्या निषेधार्थ उस्मानाबादेत काँग्रेसच्यावतीने या विधेयकाचा निषेध नोंदविण्यात येऊन याबाबत जनजाग्रतीपर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. उस्मानाबादेतील मार्केट यार्ड परिसरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरींचे निवेदन राष्ट्रपती व महाराष्ट्र कॉँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अॅड. विश्वजित शिंदे आदी उपस्थित होते.