उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भोकरदन जि. जालना येथे मेंढपाळ कुटुंबातील ज्ञानेश्वर जोशी यांचे वडील व कुटुंबातील इतर ३ ते ४ सदस्यांवर मु.पो. धनगरवाडी ता. भोकरदन जि. जालना येथे शेतात बांधावर शेळी-मेंढी गेल्यामुळे गावातीलच लोकांनी त्यांच्यावर कुन्हाडीने हल्ला केला. एका मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रामदास जोशी यांच्या चेहऱ्यावर ७-८ लोकांनी कुन्हाडीने वार केल्याने संपूर्ण जबडा फाटला आहे. कुटुंबातील सर्वजण औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात गंभीर स्वरुपात उपचार घेत असताना त्यातील एक जणाचा दि. ०७/१०/२०२० रोजी दु्देवी अंत झाला. तरी संबंधित कुटुंबावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी धनगर आरक्षण कृती समिती उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनावरे करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  संबंधित कुटुंबावर हल्ले करणाऱ्या लोकांवर कडक शासन करुन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावे,  संबंधित कुटुंबाला शासकीय नुकसान भरपाई देण्यात यावी,  संबंधित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत रुजु करण्यात यावे,   संबंधित लोकांना कडक शासन करण्याचे आदेश करावेत व पिडीत कुटुंबियाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राहुल काकडे, इंद्रजीत देवकते, गणेश येडके, देवा काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top