भारतातील आर्थिक सुविधांपासून वंचित तसेच अपुऱ्या आर्थिक सुविधा असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने अस्तीत्वात आलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) 3.6 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच बँकेने 15 सप्टेंबर 2020 पर्यंत एकूण 38 हजार 500 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहारसुध्दा पुर्ण केले आहेत.बँकेने 1 सप्टेंबर 2018 रोजी आपले कामकाज सुरु केले. फक्त दोनच वर्षात हे टप्पे गाठून आयपीपीबी ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अशी माहिती अधिक्षक, पोस्ट ऑफिस उस्मानाबाद विभाग लातूर यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बँकेने 1 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला होता. 1 सप्टेंबर 2019 ते 15 सप्टेंबर 2020 दरम्यान आयपीपीबीची इतर महत्वपूर्ण कामगिरी पूढील प्रमाणे आहे.एकूण आर्थिक व्यवहारांची संख्या 12.5 कोटी असून रक्कम सुमारे 33.600 कोटी रुपये आहे. जवळपास अडीच टक्क्यांची वाढ नोंदवत 2.5 कोटी नवीन ग्राहक जोडले.गेल्या वर्षीच्या 303 कोटी रुपयांच्या ठेवी पाच पटीपेक्षा अधिकने वाढून 1,558 कोटी रु. वर 99 टक्के आयपीपीबी खाती आधार क्रमांकासह जोडली आहे.बिल पेमेंट व्यवहारांची संख्या आणि मुल्य पाच पट वाढून अनुक्रमे 1.21 कोटी आणि 230 कोटी रुपये झाले. एईपीएस व्यवहाराची संख्या आणि मुल्य अनुक्रमे 2.8 कोटी आणि 6.182 कोटी रुपये आहे.
लॉकडाडून आणि अनलॉकच्या कालावधीत झालेले एईपीएस व्यवहार (23 मार्च 2020 ते 15 सप्टेंबर 2020) पर्यंत. प्रमुख टप्पे :- लॉकडाऊन आणि अनलॉकडाऊन कालावधीत डिजिटल पेमेंट पध्दतीस जोरदार चालना देत आधार आधिरित पेमेंट सर्व्हिसेस (एईपीएस ) व्यवहारात लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण 5,362 कोटी रुपयांचे 2.52 कोटी व्यवहार बँकेव्दारे केले गेले आहेत. एईपीएस व्यवहाराच्या संख्येच्या बाबतीत , उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात ही 3 सर्कल आघाडीवर आहेत.उत्तर प्रदेशमध्ये 61.7 लाख, तर बिहार आणि गुजरातमध्ये अनुक्रमे 20 लाख आणि 16.9 लाख व्यवहार झाले.
एईपीएस व्यवहाराच्या रकमेनुसार उत्तर प्रदेश (1151 कोटी रुपये ), आंध्र् प्रदेश (492 कोटी रुपये), आणि तेलंगणा (469 कोटी रुपये ) हे तीन सर्कल अव्वल ठरले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जोडलेल्या नवीन ग्राहकांची संख्या 1.22 कोटी आहे. ग्राहक वाढीच्या बाबतीत अव्वल 3 सर्कल अनुक्रमे बिहार (36 लाख), उत्तर प्रदेश (20.4 लाख),तामिळनाडू (10.8 लाख) ही आहेत.
19 मे रोजी एकाच दिवशी सर्वाधिक एईपीएस व्यवहाराची संख्या 5.42 लाखांवर पोहचली, तर 8 जून रोजी एईपीएस व्यवहार रकमेच्या दृष्टीने सुमारे 74 कोटींचा उच्चांक नोंदला गेला. एकंदरीत एईपीएस व्यवहाराचे प्रतिदिन सरासरी संख्या आणि रक्कम अनुक्रमे सुमारे 1.46 लाख आणि 30.5 कोटी रुपये इतके आहे.IPPB च्या एईपीएस सुविधेमुळे दिव्यांग, पेंशनधारक, आजारी आणि वृध्दांना घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध् होण्यास मदत झाली आहे. PMGKY (प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना ) अंतर्गत जमा झालेली कोणत्याही बँकेतील रक्कम लाभार्थ्यांना आयपीपीबी कडून एईपीएसच्या माध्यमातून स्थानिक / जवळच्या पोस्ट ऑफिसमधून काढून देण्यात आली. लॉकडाऊनमुळे घातल्या गेलेल्या निर्बंधांचा विपरित परिणाम होऊ नये, म्हणून सीलबंद/ कंटेनमेंट भागातील लोक, स्थलांतरीत कामगार, आणि हॉटस्पॉट्समध्ये एईपीएसमार्फत घरपोच बँकिंग सेवा पुरविण्यावर विशेष भर देण्यात आला.
एईपीएस व्यतिरिक्त, यावर्षी बँकेने प्रगति करत एक नवे उत्पादन- जीवन विमा सुध्दा सुरु केला आहे. ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध् करुन देण्यासाठी आयपीपीबी थर्ड पार्टी उत्पादनावर भर देत आहे. ज्यातून बँकेचे उत्पन्न देखील वाढेल. यासाठी बँकेने थर्ड पार्टी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी एक समर्पित टीम तयार केली आहे. आयपीपीबी ने डिसेंबर 2019 पासून लाइफ इन्शुरन्स ची सुरुवात केली व आयआरडीए मंजूर पीओएसपी लाइफ इन्शुरन्स (ग्रुप टर्म लाइफ आणि पीओएस गोल सुरक्षा) आपल्या 650 शाखांव्दारे वितरीत करीत आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे अंतरिम एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इस्वरन वेंकटेश्वर म्हणाले शेवटच्या मैलावरील कोटयवधी गरीब आणि निर्बंधित लोकांसाठी बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी आणि रोख रक्कम त्यांच्या दारापर्यंत देण्यासाठी आधार ॲनेबल्ड पेमेंट सिस्टम हा एक गेम चेंजर आहे. एक बळकट, स्वस्त आणि परस्पर व्यवहार करण्यायोग्य तंत्रज्ञानाव्दारे चालवले गेलेली, एईपीएस सेवा समाजातील प्रत्येक घटकाला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कमी खर्चात बॅकिंग सेवा प्रदान करतात आणि अशा प्रकारे र्टूली इन्क्लुसीव्ह फायनान्शियल सिस्टम ला भर देते. डिजिटल आणि तंत्रज्ञानाची शक्ती याचा फायदा घेणाऱ्या एक अनुकूल आणि चपळ व्यवसायाच्या मॉउेलव्दारे बँक आपल्या भागधारकांना सर्व्हिस करण्यास वचनबध्द आहे. तसेच प्रत्येक भारतीयांचा ट्रान्झॅक्शन करण्याचा मार्ग बदलवत आहे.
कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान डीओपी /आयपीपीबी चे योगदान- भारतीय डाक विभाग व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांनी बॅकिंग पासून वंचित अशा अगदी दुर्गम भागातसुध्दा अखंडित सेवा देण्याचे व सर्व बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. लॉकडाऊन मुळे लोकांच्या हालचालींवर निर्बंध लक्षात घेता, आयपीपीबी इतर बँकेचे ग्राहक जवळच्याच टपाल कार्यालयात किंवा पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत स्वत:च्या घरीच बॅकिंग सेवा मिळवू शकतात. कोविड-19 च्या अलीकडील आवाहानाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या घरातच मोबाइल बॅकिंग ॲपव्दारे सर्व बँकिंग सेवा वापरु शकतात.
पोस्ट ऑफिस बचत खाते व आयपीपीबी च्या ग्राहकांना पूढील बॅकिंग सुविधा उपलब्ध् आहेत. रोख पैसे काढणे, पैसे हस्तांतरण (ट्रांन्सफर), बिल भरणा, थेट लाभ हस्तांतरण (DBT)लाभार्थ्यांना पैसे देणे, आधार आधारीत पेमेंट सेवा (AEPS )ईमेलव्दारे खाते स्टेटमेंट, पैसे पाठविन्यासाठी IMPS, NEFT, RTGS सुविधा, मेसेज (SMS )व्दारे खाते चौकशी व स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस बचत खात्याला आयपीपीबी खाते जोडण्याची सुविधा, पोस्ट ऑफिसच्या विविध योजना ऑनलाईन. आयपीपीबीच्या अधिक माहितीसाठी www.ippbonline.com या संकेत स्थळावर भेट दयावी. असे अधिक्षक पोस्ट ऑफिस उस्मानाबाद विभाग मुख्यालय, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.