उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हक्काच्या एस. टी. प्रवर्गातील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. आज दि ६ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद येथे भव्य मोर्चा आणि रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

हा मोर्चा  दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. या मोर्चासाठी  प्रकाश अण्णा शेंडगे, प्रा. राम शिंदे, आ.गोपीचंद पडळकर, गणेश दादा हाके,सुरेश भाऊ कांबळे,भारत सोन्नर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांची उपस्थिती राहणार आहे तसेच आंदोलनाला उपस्थित राहणाऱ्यांनी  कोव्हिड १९ च्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

 
Top