उस्मानाबाद /प्रतिनिधी -
बेंबळी येथील रहिवासी तथा प्रगतशील शेतकरी शिवाजी काशिनाथ पाटील ( 61 ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवार दि.12 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी लिंगायत स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक गावातील प्रतिष्ठित नागरिक, मित्रपरिवार उपस्थित होता. शिवाजी पाटील हे जागृत देवस्थान श्री अंतेश्वर मंदिर येथे नियमित पूजाअर्चा करीत असत ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या अवेळी जाण्याने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन सुना, चार बहिणी, एक भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे