वाशी / प्रतिनिधी-
 वाशी येथे ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची गर्दी वाढत आहे.परंतु वाशी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक ह्या अत्यंत कामचुकार व अकार्यक्षम असल्यामुळे, रुग्णां मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे वाशी शहराचे नगराध्यक्ष नागनाथ  नाईकवाडी  यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना लेखी निवेदन देऊन, अकार्यक्षम वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार काढून त्या ठिकाणी योग्य वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
त्याचबरोबर या निवेदनामध्ये लिहिले आहे की, वाशी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक या मुख्यालयी राहत नसून,त्या रुग्णा सोबत, तसेच रुग्णा सोबत आलेल्या नातेवाईका सोबत उद्धट पनाने वागतात.तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनाहि त्या रुग्णाबद्दल व इतर माहिती व्यवस्थित पणे देत नाही .तसेच रुग्णालयीन कर्मचार्यांच्याही वैद्यकीय अधिक्षकाविरोधात अनेक तोंडी तक्रारी स्थानिक लोक प्रतिनिधींकडे केलेल्या आहे.परंतु दबावापोटी कोणीही लेखी तक्रार देण्यास तयार नाही.त्याचबरोबर मागील दोन वर्षापासून वाशी ग्रामीण रुग्णालय मध्ये एकही कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेली नाही. त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक वारंवार गैरहजर असल्यामुळे वाशी ग्रामीण रुग्णालयांमध्ये  उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना कळंब किंवा उस्मानाबाद येथे रेफर करण्यात येते.त्यामुळे वाशीचे ग्रामीण रुग्णालय असून अडचण आणि नसून खोळंबा झालेला आहे.त्यामुळे या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ वाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा पदभार काढून योग्य वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी वाशीच्या नगराध्यक्षांनी जिल्हा शल्य चिकित्सक उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे
 
Top