उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 मराठा सेवा संघाच्या नूतन पदाधिकारी निवडीसंदर्भात नुकतीच विभागीय अध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन जिल्हाध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवड झाली. मागील सहा वर्षापासून अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे प्रकाश धस यांचा सूर्यवंशी यांनी सत्कार केला.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रशिक्षक संभाजी नवहारे, सचिव भास्कर वैराळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, दत्ताभाऊ कवडे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, रोहित पडवळ, मनिषा राखुंडे-पाटील, बालाजी पाटील, बालाजी नाईकनवरे, बालाजी सुरवसे, बाळासाहेब लोमटे-पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण पडवळ, विजयसिंह घोगरे, गणेश सूर्यवंशी, गणेश कोकाटे अादींची उपस्थिती होती. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष तुषार पाटील यांनी मराठा सेवा संघाचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून संघटन आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शामकांत नाईकनवरे यांनी आभार मानले.


 
Top