उस्मानाबाद / प्रतिनिधी-
प्रहार संघटना उस्मानाबादच्या वतीने  जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या जीवनावर आधारित लोकनायक हे जीवनचरित्र देऊन सत्कार करण्यात आला.
 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांनी मोठ्या मनाने संघटनेच्या सर्व दिव्यांग व्यक्तिनंचा मान राखून सत्कार स्वीकार केला व दिव्यंगाच्या विविध विषयावर सकारत्मक चर्चा करुन माझ्या कार्यकाळत सघटनेला आंदोलनाची आवश्यकता भासनार असे आश्वासन देऊन एक प्रकारचा मोठा दिलासा दिला यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यानी प्रहार विषयक सविस्तर माहीती दिली सदरील सत्कार जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
यावेळी संघटनेचे कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब अकोसकर,जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे ,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील ,जिल्हासचिव महादेव चोपदार,जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी,चंद्रजीत राऊत, आबा काळे हे उपस्थित होते.

 
Top