उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल येथील कार्यरत शिक्षक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक संतोष पाटील गोराडखेडेकर यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली .
ग्लोबल पीस  युनिव्हर्सिटी  अमेरिका यांच्यातर्फे त्यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली . पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल भोकरदन येथे कार्यरत शिक्षक आहेत त्याच बरोबर ते व्याख्याते लेखक व समाजसेवक आहेत . ते आपल्या व्याख्यानाच्या मानधनातून विभिन्न वृद्धाश्रम अनाथालयांत  धान्य व औषधी देत असतात . ते रस्त्यावर असणारे भिकारी व इतर गरजू लोकांना नियमित मदत करत असतात . बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचे कार्यसुद्धा त्यांनी केलेले आहेत . या  कार्यासाठी  त्यांना  राष्ट्रीय व   राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत . त्यांनी आतापर्यंत नॅशनल व वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा   त्यांच्या नावे आहे .
डॉक्टर दत्ताजी शिंदे ,डॉक्टर विलास कदम , डॉक्टर संदीप सिंग यांच्या हस्ते त्यांना भारती विद्यापीठ नवी मुंबई येथे डॉक्टरेट प्रदान करण्यात आली .आता आपला आत्मविश्वास अजून जास्त झाला असून सामाजिक कार्यात झोकून देण्याची त्यांनी बोलून दाखवले.
 
Top