उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद, आंबी ता, मावळ, जि, पुणे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील विध्यार्थीनी अश्विनी ढेरे हिने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गावसुद ता,जि, उस्मानाबाद येथे माती परीक्षण बाबत तांत्रिक माहिती दिली.

माती परीक्षण नुसार पिकांना सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे नियोजन कसे करायचे, या बाबत गावांतील शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन देखील केले, कार्यक्रम समन्वयक एस,एस, निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी सी,ए, नाईकरे मॅडम, तसेच विषय तज्ज्ञ प्रोफेसर गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top