उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते.  चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, पण केंद्रातील जुलमी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.या निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव पडून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि.18 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष धीरजभैय्या पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मणदादा सरडे, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, प्रशांत पाटील, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, बेंबळीचे माजी सरपंच सत्तार शेख, माजी शहराध्यक्ष हरिभाऊ शेळके, धनंजय राऊत, कार्याध्यक्ष अलीम (L.D.) शेख, युवक काँग्रेसचे सलमान शेख, सरचिटणीस अनिल नळेगावकर, विधी विभागाचे विश्वजित शिंदे, राहुल लोखंडे, अतुल देशमुख, संजय गजधने, प्रेम सपकाळ, विद्यार्थी काँग्रेसचे सौरव गायकवाड, कफिल सय्यद, अतिफ शेख, समाधान घाटशिळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते


 
Top