उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबादचे सुपुत्र बारामती येथील ख्यातनाम शल्यचिकित्सक डाॅ. विजयकुमार सांभराव नायगांवकर (एम.एस.) यांचे दीर्घकालीन आजाराने दि.17 रोजी  बारामती येथे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 
त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगी, जावाई, दोन मुले डाॅ. परेश, डाॅ.निलेश, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगांवकर व पेन्शनर संघटनेचे उमाकांतराव नायगांवकर यांचे ते कनिष्ठ बंधू तसेच डाॅ.अजित नायगांवकर व औषध व्यापारी मुकेश नायगांवकर यांचे ते चुलते होत.
x
 
Top