गोविंद पाटील / प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील प्रत्येक घराशी कधी ना कधी संबंध आलेल्या पोस्ट कार्यालयात आता विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सेवा मिळणार आहेत. आपले बँक खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत असू द्या, त्या बँक खात्यातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पैसे मिळण्याची नवी सुविधा उपलब्ध झाली आहे. आता तर अकरावीपासून पुढील उच्च शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम सुध्दा आपल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यावर जमा होण्याची सुविधा झाल्याने विद्यार्थ्यांचा कल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडे वळला आहे. मोबाइलवर आपले बँक खाते हाताळता येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे क्षेत्रीय विक्रेय प्रबंधक योगेश दुर्गे यांनी दिली आहे.
दहावीनंतर अकरावीत प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते. त्यासाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँक खाते गरजेचे होते. आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सुध्दा राष्ट्रीयीकृत बँक आहे. मोबाइलवर अवघ्या एका मिनिटांत विद्यार्थी इंडिया पोस्ट पेमेंट बँकींग म्हणजेच ‘आयपीपीबी’ या अॅपद्वारे आपले बँक खाते उघडू शकतो. पोस्टात खाते उघडताना विद्याथ्यार्ंंना अॅप्लीकेशन आयडी द्यावा लागतो. उघडलेल्या बँक खात्याची माहिती विद्यार्थी ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज करतेवेळी भरू शकणार आहेत. मॅट्रिकोत्तर विद्याथ्यार्ंसाठी मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यात जमा होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दहावीतून अकरावीत प्रवेशित झालेल्या सात हजार लाभार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून मोबाइल संदेशाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. त्याला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे.
मागील आठ दिवसात 70 विद्यार्थ्यांनी खाते उघडले आहे. ऑनलाइनसह प्रत्येक पोस्ट कार्यालयात आपले बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहर व जिल्ह्यातील मुख्य डाकघर, उप डाकघर आणि गावागावातील प्रत्येक शाखा डाकघरांमध्ये बँकिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून विद्यार्थ्यांसह निराधार, सर्वसामान्यांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.
सर्वांचे पोस्टात खाते असावे
आपले पोस्ट कार्यालय आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग सेवा देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून मजूर, वृध्द नागरिक, नोकरदार, व्यावसायिकांना गावातच राष्ट्रीयकृत बँकेची सर्व सुविधा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकखाते असावे. खाते उघडण्यासाठी आधारकार्ड क्रमांक व मोबाइल क्रमांक घेवून आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा. तेथील पोस्टमन आपल्याला सर्व सहकार्य करेल, असे क्षेत्रीय विक्रय प्रबंधक योगेश दुर्गे यांनी आवाहन केले आहे.