तुळजापूर/ प्रतिनिधी-
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभाव पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील शुक्रवार पेठ आठवडा बाजार भागात असलेल्या नगरपरिषदच्या १२४ रुम असलेल्या  भक्त निवास मध्ये सुरु असलेल्या कोविड 19 रुग्णालयात टाकण्यात येत असलेल्या आँक्सीजन लाईन ्या कामाची पाहणी मंगळवार दि.16 रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. व नंतर   क्वारटांईन व कोरोनाबाधीत रूग्णांशी  चर्चा करुन सोयीसुविधा उपलब्ध होतात कि नाही, औषधे, भोजन वेळेवर योग्य मिळते कि नाही, याची पाहणी केली.
कोरोना रुग्णांचा वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार पेठ भागात असणाऱ्या नगरपरिषदच्या भक्त निवास मधील कोविड रुग्णालयातील खालच्या मजल्यावर 130 बेडसाठी आँक्सीजन कनेक्शन टाकण्याचे काम चालु असुन आतापर्यत याचे 65% टक्के काम झाले असुन या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करुन  उर्वरीत काम लवकर करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार सौदागर सांळुके,   उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधिकारी डाँ.चंचला बोडके, डाँ. शिरसीकर उपस्थितीत होते.
 
Top