तुळजापूर / प्रतिनिधी

 शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.  येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते रोहन देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटरला भेट देत तेथील सोयी सुविधांची माहिती घेतली.व काही मदत हवी असल्यास ती देण्याची ग्वाही दिली,

कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने तुळजापुरात गेल्या आठवड्यात शहरात जनता कर्फ्यु होता. शहरातील कोरोना रूग्णांवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रोहन देशमुख यांनी  रूग्णालयास भेट देऊन त्यांनी डॉक्टरांनाकडून तेथील रूग्णांची माहिती घेतली.  रूग्णालयात काय सोयी- सुविधा आहेत हे जाणून घेतले. रूग्णांवर व्यवस्थित उपचार करावेत, काही मदत लागत असल्यास त्वरित कळवावे, असे देशमुख यांनी डॉक्टरांना सांगितले. याच रुग्णालयात भाजपचे  दत्ता राजमाने हेही उपचार घेत आहेत. त्यांचीही भेट घेऊन विचारपूस देशमुख यांनी केली. 

यावेळी प्रभाकर मुळे, शिवाजी बोधले, अनिल जाधव, बाळासाहेब भोसले, बालाजी शिंदे, सचिन अमृतराव, सचिव हरिभाऊ वट्टे, पंकज पाटील, गजानन वडणे, अनंत बुरांडे, अजय ढोणे, लिंबराज साळुंके, बाबा बेटकर आदी उपस्थित होते.

 
Top