काटी / प्रतिनिधी 
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील मनमिळाऊ, सुसंस्कृत, सांप्रदायिक क्षेत्रातील नामवंत तथा  प्रगतशील व सदन शेतकरी सुखदेव बाबुराव काळे  वय (85) यांचे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात  उपचारादरम्यान प्रदिर्घ आजाराने गुरुवार दि. 10 रोजी संध्याकाळी 11:30 वाजता  दुःखद निधन झाले. ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे यांचे वडील होत.
 प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवार दि. 12 अॉगस्ट रोजी  तुळजापूर येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना विलिनीकरण कक्षात ठेवणात आले होते. परंतु अॉक्जिजन घेण्यास त्रास होऊ लागल्याने व अॉक्जिजनची लेव्हल कमी झाल्याने त्यांचे चिरंजीव भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे यांनी तात्काळ त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मागील 26 दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. परंतु या कोरानाच्या लढाईतील त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली व गुरुवार दि.10 रोजी रात्री 11:30 वाजता त्यांना  देवाज्ञा झाली. केमवाडी येथील एक अतिशय मनमिळाऊ, सुसंस्कृत, व सांप्रदायिक क्षेत्रातील पंचक्रोशीतील एक नामवंत व्यक्तीमत्व तथा प्रगतशील व सदन शेतकरी हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात पत्नी चार मुले, एक मुलगी,जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top