उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील जनतेने मला दोनवेळा वेगवेगळ्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. मी ठेकेदार असतो, तर जनतेने मला घरी बसवले असते असेही प्रत्युत्तर शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी भाजपचे सतीश दंडनाईकांना दिले आहे. यावर प्रभाग 2 मधील राणा दादा कट्टर समर्थक व गुरव यांचे प्रतीस्पर्धी उमेदवार लक्ष्मण माने यांनी या वाक्य युध्दात उडी घेतली असून सोमनाथ गुरव यांनी आपली क्षमता ओळखून आमच्या नेत्यांबाबत विधान करावे. जेवढी आपली उंची तेवढेच बोलावे कुठल्या तरी काॅप्लेक्स मधुन तयार करून दिलेल्या बातम्या स्वताच्या नावावर खपऊन प्रसिद्धी मिळविण्या पेक्षा प्रभागातील तुंबलेल्या नाल्या व गटारीकडे व तसेच प्रलंबित कामा कडे लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला दिला आहे.
मि गुत्तेदारी करत नाही, असे धादांत खोटे विधान करण्यापेक्षा प्रभागातील ठेकेदारी मध्ये त्या ठेकेदारा बरोबर आपण भागीदार आहेत. याचे आम्ही व प्रभागातील नागरिक साक्षीदार आहेत. नगरपालिकेच्या ठेकेदारीवर मलिदा मिळवुन मुंबई दिल्लीच्या गप्पा मारने बंद करावे, तुमचा नेता किती धुतल्या तांदळाचा आहे. हे आम्हाला माहित आहे. तुमच्या नेत्यांना एवढंच सांगा की, कुरघोडीचे राजकारण करण्यापेक्षा जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करा आणि नसते उद्योग बंद करा, अशीही टीका लक्ष्मण माने यांनी सोमनाथ गुरव यांच्यावर केली आहे.