उस्मानाबाद/ प्रतिनिधी
ढोराळा (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथे गाव अंतर्गत जनसुविधेतुन रस्ते व नाली कामासाठी 10 लक्ष रु., स्मशानभूमी साठी 5:50 लक्ष रु., ग्रामपंचायत समोर पीव्हीन ब्लॉक बसवणे 3 लक्ष रु, मुख्यमंत्री पेयजल पाणी पुरवठा योजनेतुन 65 लक्ष रु. टाकीचे लोकार्पण अशा विविध विकास कामाचे उद्घाटन उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आ. कैलास घाडगे-पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सोसायटी चेअरमन पांडुरंग चौधरी, व्हा. चेअरमन विलास राऊत, सरपंच दिलीप चौगुले, उपसरपंच आप्पासाहेब जायभाय, माजी सरपंच सुनिल नाईकनवरे, मुरलीधर पाटील, मारुती राऊत, विश्वनाथ चौधरी, नाना पाटील, भैरू नाईकनवरे, बाबुराव नाईकनवरे, प्रा.प्रल्हाद चौधरी, महादेव मगर, नितिन भोसले, बालाजी लोमटे आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top