शिराढोण /प्रतिनिधी-  

चोरी गेलेल्या मोटरसायकलचा तात्काळ तपास लाऊन आरोपीस जेरबंद केल्यामुळे शिराढोण पोलिसांचे कौतुक होत आहे तर आणखीन आरोपी पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस यंत्रणेनेचा कडक तपास सुरू आहे 

कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील सुखदेव भास्कर मुळे यांची हिरोहंडा कंपनीची मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार शिराढोण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती शिराढोण पोलिसांनी तपास पथक तयार करून आरोपी राजु अर्जुन काळे रा हिवरा ता भुम यास अटक अटक केली असता त्याने हिरोहंडा गाडी व बुलेट मोटरसायकल चोरली असल्याचे सांगितले

सदरची गाडी ही परभणी जिल्हयामध्ये एका ईसमाला  विकली असल्याचे सांगितले सदरील ईसमाचा शोध घेतला असता गंगाखेड येथे बुलेट मोटरसायकल मिळुन आली त्या मोटरसायकल ची खात्री केली असता सदरील मोटरसायकल ही ढोकी पोलीस स्टेशन अंतर्गत तडवळयाचे सरपंच मन्मथ औटी यांची असल्याचे समजले व ढोकी पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन जप्त करण्यात आलेली मोटरसायकल व सदरील आरोपी ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे परंतु परभणी येथील मोटरसायकल घेणारा आरोपी अब्दुल साजीद अब्दुल गफार हा मात्र अद्यापही सापडला नाही 

सदरील कारवाई उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शौकत पठाण मदतनीस सुनील तारळकर पोलीस काँ विजय घोडके यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड या सर्वानिच अथक परिश्रम घेऊन आरोपीस अटक करून मोटरसायकल जप्त केली परंतु आणखीन काही आरोपी शिराढोण पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले या कारवाई चे उस्मानाबाद जिल्ह्यात शिराढोण पोलिसांचे कौतुक होत आहे 

सुखदेव मुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि नं 147/20 व बन्सी कापसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि नं 119/20 कलम 379 प्रमाणे नोंद करण्यात आला आहे

 
Top