उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील आंबेवाडी येथील जेष्ठ नागरिक विश्वनाथ केशव  क्षिरसागर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 90 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसापासून आजारी होते. त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली होती. ते गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने आंबेवाडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आंबेवाडी गावचे माजी सरपंच नवनाथ क्षिरसागर यांचे ते वडिल होत.

 
Top