उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 प्रा. काकासाहेब शिंदे हे प्रदीर्घकाळ तुळजापूर तालुक्यात राजकारण समाजकारण आणि कलाक्षेत्रात सक्रिय राहिले. त्यांच्या आकस्मिक निधनाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बालाघाट शिक्षण संस्थेच्या वतीने प्रा. काकासाहेब शिंदे यांना  श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी माजी मंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी,  माजी आमदार नरेंद्र बोरगावकर,  संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर, संस्थेचे संचालक बाबूराव चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. मोहन बाबरे आदींनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

 
Top