उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 तालुक्यातील कामेगाव येथे कोरोना महामारीने एकाचा बळी घेतला आहे. हभप काकासाहेब भैरु मोरे (वय 55) यांच्या शनिवारी (दि.12) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथे उपचारादरम्यान  निधन झाले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामेगाव येथे कोरोना संसर्गाचा फैलाव निर्माण झाला आहे. गावात 9 जणांना कोरोनाची लागन झाली होती. त्यापैकी काही रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरे गेले आहेत. हभप काकासाहेब मोरे यांना कोरोनाची लागन झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 7) दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले. हभप मोरे यांनी परिसरात अनेक गावात किर्तनाची सेवा बजावली होती. त्यामुळे ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी त्यांच्यावर उस्मानाबाद नगर पालिका व आरोग्य विभागाच्या वतीने येथे कपिधारस्मशान भूमित अंत्यसंकार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. हभप मोरे यांच्या कोरोना निधनामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
Top