कळंब (शहर प्रतिनिधी) :-
विविध मागण्या साठी आय एम ए ने सरकार विरुद्ध असहकार आंदोलन दि 9 तारखेपासून सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी  दु ४ वा संपूर्ण राज्यात सामुदायिक प्रतिकात्मक प्रमाण पत्रांची होळी करण्यात आली.
उद्या पासुन डॉक्टर्स आणि हॉस्पिटल स्टाफ 14 दिवसांसाठी सेल्फ क्वरांटाईन होणार आहेत. यामुळे आरोग्य सेवा कोलमडली जाऊ शकते. या व इतर उद्भवणाऱ्या परिस्थितसाठी शासन जबाबदार राहिल असे प्रशिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शाखाध्यक्ष डाॅ. कमलाकर गायकवाड, डाॅ. दिनकर मुळे, नियोजित प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ अभिजीत लोंढे, हॉस्पिटल स्टॉफ आदींनी पुढाकार घेतला.
 
Top