उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
आमदार ठाकूर यांच्या येथील संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस (संघटन) अॅड. नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, उस्मानाबाद शहराध्यक्ष राहुल काकडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बुद्धीजीवी प्रकोष्ट संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस अॅड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुबोधसिंह ठाकूर, विठ्ठल तिपाले, उमाकांत गोरे, अजित काकडे, समीर पठाण, संकेतसिंह ठाकूर, प्रमोद लिमकर, बाळासाहेब गोडगे, अविनाश विधाते, सूरज काळे, सिद्धीक हन्नूरे, अभय देशमुख, गौरव पाटील उपस्थित होते.

 
Top