तुळजापूर / प्रतिनिधी
 शिक्षक दिनानमित्त राष्ट्रवादी युवक वतीने न.प.शाळा  तुळजापुर(खुर्द) मधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी सर्वपल्ली डाँ.राधाक्रष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन  शहराध्यक्ष श्री.अमर चोपदार यांच्या हस्ते प्रथमता  मुख्याध्यापक मोटे सर यांचा सत्कार  करण्यात आला.
 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम,  गणेश नन्नवरे, संदीप गंगणे, तौफीक शेख, मकसुद शेख, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे यांच्या हस्ते  प्रमुख शिक्षक साळुंके सर,राऊत सर,निडवंचे सर,कुलकर्णी मैडम,सय्यद मैडम,गायकवाड मैडम,जाधव मैडम,भोजणे मैडम,कर्मचारी संजित देडे  यांचा सत्कार  करण्यात आला.

 
Top