परंडा / प्रतिनिधी- 
देशाचे पंतप्रधान, मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमीत्त भाजपाच्या वतीने देशभर सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणुन आ.सुजितसिंह ठाकुर  यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुका भाजपा, व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने परंडा तालुक्यातील चिंचपुर (बु) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात एकुण ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबीराचे उद्घाघाटन भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, युवा मोर्चाचे अनिल पाटील, जि.प.सदस्य रमेश पवार, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस ॲड. जहीर चौधरी, पं.स.सदस्य सतीष देवकर, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, भाजपा मिडीया सेलचे तालुकाअध्यक्ष निशीकांत क्षिरसागर, तानाजी पाटील, प्रमोद लिमकर, सागर पाटील, शरद कोळी, अशोक भोळे, बाळु गोडगे, महेश देवकर, भुषण देवकर, सचिन पवार, दत्ता सुतार, विजय पाटील, जॉकी शिंदे, महाविर जाधव, बालविर शिंदे, समाधान देवकर, जोतीराम गिरवले, राहुल शिंदे सर, रंजीत काकडे, संजय अनभुले यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
Top