परंडा / प्रतिनिधी :-
दि.८ सप्टेंबर २०२० दिनांक ३ मार्च २०२० राेजी परंडा तालुक्यातील डाेंजा येथिल खैरी नदीच्या पात्रात सापडलेल्या प्राचीन मंदीराबाबत नवी दिल्ली येथिल भारतातील सर्वात माेठी अांतरराष्ट्रीय हेरिटेज संस्था इंडीयन नॅशनल ट्रस्ट फाॅर अार्ट अॅंड कल्चरल हेरिटेज नवी दिल्लीने त्यांचा चालू अांतरराष्ट्रीय तिमाही अंक “ विरासत” मध्ये डाेंजा येथिल प्राचीन मंदिराच्या अवशेषाच्या छायाचित्रासह वृत्तांत छापून जगभरात प्रसिद्ध केला अाहे.
“ विरासत” इंग्रजी भाषेतील तिमाही अंक हा अांतरराष्ट्रीय हेरिटेजची सर्वाेच्च संघटना युनेस्काेसह जवळ जवळ १३० देशांमध्ये पाेहचताे. त्यामुळे डाेंजासह उस्मानाबादचे नाव यामुळे युनेस्काेसह १३० देशांमध्ये पाेहचले अाहे. इंडीयन नॅशनल ट्रस्ट फाॅर अार्ट अॅंड कल्चरल हेरिटेज नवी दिल्लीचे आजीव सद्स्य अजय माळी यांनी डाेंजा येथिल सापडलेल्या मंदिर अवशेषांची प्रसिद्धी हाेवून पर्यटन वाढीसाठी नवी दिल्ली येथे माहिती पाठविली हाेती.
सदर वृतांतामध्ये परंडा तालुक्यातील डाेंजासह भूम तालुक्यातील माणकेश्वर येथिल १२ व्या शतकातील (शिवमंदिर ) मल्लीकार्जुन मंदीराचा इतिहास, प्राचीन परंडा नगराचा इतिहास, अजय माळी यांचे ऐतिहासिक परंडा किल्ला, ऐतिहासिक परंडा तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील वारसास्थळे / वास्तू यांवर इंडीयन नॅशनल ट्रस्ट फाॅर अार्ट अॅंड कल्चरल हेरिटेज नवी दिल्ली, मा.राज्यसभा खासदार मा.छत्रपती संभाजीराजे तसेच महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शास्राेक्त पद्धतीने संशाेधन व माहितीकाेष बनविणे सुरू असून पुढील काही महिण्यात ते पूर्ण हाेवून इंडीयन नॅशनल ट्रस्ट फाॅर अार्ट अॅंड कल्चरल हेरिटेज नवी दिल्लीच्या माध्यमातून युनेस्काेला त्याची इंग्रजी भाषेतील प्रत जाणार आहे. त्यानंतर यांवर माेठा प्रकाश पडून याभागाची माेठी प्रसिद्धी हाेवून जगभरातील पर्यटक येथे येण्यास पुरक वातावरण तयार हाेईल. ही बाब उस्मानाबाद जिल्ह्यास अभिमानास्पद अशीच आहे. यापुर्वी डाेंजा हे गाव भारतरत्न सचिन तेंडूलकरमुळे जगाच्या पटलावर आले हाेते.
प्राचीन परंडा नगराचा इतिहास - परंड्याची प्राचीन नाेंद धारवाड जिल्ह्यातील हावेरी तालुक्यांतील हाेन्नती येथिल शिलालेखात (ई.स.११२४) पळियंड अशी आहे. यात पळियंड या प्रदेशावर राज्य करणाऱ्या महामंडलेश्वर सिंघणदेवाचा उल्लेख आहे. हा पळियंड म्हणजेच सध्याचे परंडा हाेय. तसेच प्रत्यंडक असाही परंड्याचा उल्लेख आढळताे. हा उल्लेख हेमाद्रीने लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथातील व्रतखंडाच्या प्रस्तावनेत येताे. या ग्रंथात हेमाद्री म्हणतात की, यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले. राजा भिल्लम पाचवा यांच्या एका स्वारीत याची नाेंद आहे. श्री शिवभारत काव्यात त्याचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळताे. तर पुराणात याचा उल्लेख परधामपूर या नावाने आढळताे.

 
Top