उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपायोजना नियम, 2020 प्रसिद्ध केले असून नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी राज्यातील सर्व कोविड-19 रुग्णालये आणि कोविड--19 हेल्थ सेंटर मधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवणेबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध व्हावा. यासाठी जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी होण्या-या ऑक्सीजनच्या पुरवठ्याशी संबंधित अडचर्णींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये पुढीलप्रमाणे अधिकारी यांची नियुक्ती करीत आहे.
या समितीमध्ये नियुक्त केलेले अधिकारी यांचे नाव पदनाम व कार्यालयाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत.श्री.जावळीकर मो.क्र.-9822733902 व्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद श्री.बिराजदार मो.क्र.7620545650 निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद वरीलप्रमाणे नियुक्त अधिका-यांनी जिल्ह्यातील दैनंदिन ऑक्सीजनची गरज व ती पुरविणा-या Botling Plants, Bulk Suppliers यांचे सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांचेकडून जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणा-या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका/नगर पंचायती आणि खाजगी रुग्णांना प्रतिदिन लागणा-या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार प्राप्त करुन घ्यावी आणि ती महिती निवासी उपजिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांना सादर करावी.
सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांनी लिक्वीड ऑक्सीजन उत्पादक, बॉटलिंग प्लॅन्ट्रस आणि अन्न व औषध प्रशासनाचे ऑक्सीजन. पुरवण्यासाठीचे जिल्हावार नोडल अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक तसेच लिक्वीड ऑक्सीजन आणि ऑक्सीजन सिलेंडरच्या किंमती यांची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांचेकडे सादर करावी.जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये नियुक्त केलेल्या वरील अधिका-यांनी Oxygen Supply संबंधित अडचणी सोडवणूक करण्यासाठी काम करावे. काही अडचण असल्यास FDA कंट्रोल रुम दूरध्वनी क्र. 022-26592364, Toll Free No-1800 222 365 वर संपर्क साधावा. लिक्वीड ऑक्सीजनची आवश्यकता, उपलब्धता, पुरवठा व वितरण याबाबतचा दैनंदिन अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करावा.
उपरोक्त नुसार कार्यवाही करुन सर्व रुग्णालयांस ऑक्सीजन पुरवठा सुरळीतपणे सुरु राहण्याच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत नियमितपणे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचेकडे अहवाल सादर करावा. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे ही आदेशात नमुद केले आहे.