उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास घाडगे-पाटील यांची कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते सध्या पुणे येथे एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना थोडे लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून पुणे येथे कोरोनाचाचणी केली. यावेळी त्यांचा अहवाल शुक्रवारी (दि.११) पॉझिटिव्ह आला आहे.
आमदार कैलास पाटील यांचे स्वीय सहाय्यक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दि.५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे अधिवेशनासाठी गेलेल्या कैलास पाटील यांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली होती. याचा अहवाल निगेटीव्ह होता. तसेच अधिवशेनापूर्वी झालेली अॅन्टीजेन टेस्टही निगेटीव्ह आली. अधिवेशन संपल्यानंतर मुंबईतील विविध विभागाकडे असलेली कामे करण्यासाठी ते थांबले होते. त्यानंतर गुरूवारी ते पुणे येथे आले. यावेळी त्यांना कोविडच्या अनुशंगाने थोडी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी पुन्हा टेस्ट करून एक्सरे काढून तपासणी केली. यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत व्यवस्थित असून स्वत: आमदार कैलास पाटील यांनी मी व्यवस्थित असून मागील दहा दिवसांच्या कालावधीत ज्यांचा माझ्याशी संपर्क आला आहे त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, विलगीकरण पाळून लक्षणे जाणवल्यास तत्काळ तपासणी करून घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.