कळंब  / प्रतिनिधी-
  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या झालेल्या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.चद्रकांत शिंदे यांच्या हस्ते श्री. बालाजी पांचाळ यांची संघटनेच्या जिल्हा सचिव पदी निवड करून त्यांना  नियुक्तीपञ देण्यात आले. 
जिल्हाधिकारी कार्यालय इमारत येथे झालेल्या नियुक्ती वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी संघटनेची भविष्यातील  वाटचाल व  ध्येयधोरणे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी  उपाध्यक्ष श्री.ए.एफ.शेख, कार्याध्यक्ष श्री.यशवंत डोलारे व महसुल संघटनेचे श्री. मैंदपवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बालाजी पांचाळ यांचे सर्वांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
 
Top